Saturday, 8 August 2020

 इ.५ वी शिष्‍यवृत्‍ती परीक्षा व इ.४थी ते ७वी पर्यंतच्‍या विदयार्थ्‍यांचे सामान्‍यज्ञान वाढविण्‍यासाठी  "चला वाढवूया, आपले सामान्‍यज्ञान" हे App महत्‍वाचे आहे.


App डाऊनलोड करण्‍यासाठी खालील चिञावर क्लिक करा. 




चला वाढवू या , आपले सामान्‍यज्ञान या App मधील प्रश्‍न सोडविण्‍यासाठी खालील पुढे बटनाला टच करा.



Thursday, 6 August 2020


"चला वाढवू या, आपले सामान्‍यज्ञान" या उपक्रमांतर्गत इ.४थी ते ७ वी या वर्गात शिकणा-या  विदयार्थ्‍यांचे सामान्‍यज्ञान वाढविण्‍यासाठी तसेच इ. 5वी शिष्‍यवृत्‍ती परीक्षेच्‍या तयारीसाठी आवश्‍यक प्रश्‍नसंग्रह व सराव चाचणी या ठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. प्रत्‍येक महिन्‍याच्‍या १ तारखेस या ठिकाणी  एक ऑनलाईन चाचणी घेण्‍यात येईल. सदर चाचणीत जे विदयार्थी ६० टक्‍क्‍या पेेेेेक्षा जास्‍त गुण घेतील अशा विदयार्थ्‍यांना ई-प्रमाणपञ त्‍यांच्‍या ई-मेल वर पाठविण्‍यात येईल.

 

पुढे जाण्‍यासाठी  बटनाला टच करा. 






Friday, 15 January 2016

ऑफलाईन अॅप्‍स

विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी खालील शैक्षणिक अॅप्‍स्‍ा तयार केलेले आहेत . मा.आ.श्री राजेश टोपे (माजी उच्‍च व तंञ शिक्षण मंञी ) यांच्‍या हस्‍ते त्‍यांचे उद्घाटन करण्‍यात आले . तुम्‍ही ते डाऊनलोड करुन वापरु शकता 

वैशिष्‍टये -
१.  इंटरनेट शिवाय चालणारे ऑफलाईन अॅप्‍स.
२.  तात्‍काळ टक्‍केवारीसह  निकाल
३. चुकलेल्‍या प्रश्‍नांची बरोबर उत्‍तरे लगेच समजणार.
४.  प्रत्‍येक वेळेस प्रश्‍नांचा व पर्यायाचा क्रमांक बदलून येणार.
५.  विदया‍र्थ्‍यांना कृतियुक्‍त अनुभव देण्‍यास उपयुक्‍त.

Make meaningful words          डाऊनलोड
४ थ्‍ाी परिसर अभ्‍यास                 डाऊनलोड
पाढे १ ते १०                               डाऊनलोड

       अजून इतरही शैक्षणिक अॅप्‍स डाऊनलोड करा खालील लिंक वरुन 

शैक्षणिक अॅप्‍स डाऊनलोड

Monday, 17 August 2015

अध्‍ययन-अध्‍यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्‍यांचा कृतियुक्‍त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in  या संकेतस्‍थळावर ई-प्रश्‍नपेढी तयार करण्‍यात आलेली अाहे. 

ई-प्रश्‍नपेढीची वैशिष्‍टये -
   १. इंटरअॅक्‍टीव पध्‍दतीचा वापर करुन तयार करण्‍यात आलेली प्रश्‍नपेढी.
   २. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
   ३. प्रत्‍येक प्रश्‍न सोडविल्‍यास उत्‍तर चूक की बरोबर आहे हे समजते.
   ४. प्रत्‍येक चाचणी नंतर तात्‍काळ निकाल येतो.
   ५. कॉम्‍प्‍युटर, प्रोजेक्‍टर वर सुलभतेने वापरता येते.
   ६. ई-प्रश्‍नपेढी सहजरित्‍या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्‍ये ई-प्रश्‍नपेढीच्‍या फाईल तयार करण्‍यात आलेल्‍या आहेत
   ७. विदयार्थी कृतियुक्‍तपणे सहभागी होतात.


इयत्‍ता १ ली साठीची ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इ.१ली ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा.       


इ.२ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.३ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.४ थी ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


            आपणास ई-प्रश्‍नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्‍य प्रतिक्रिया देण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

वाचकांच्‍या प्रतिक्रिया नोंदवा.

Sunday, 9 August 2015

सरल संगणक प्रणाली

सरल संगणक प्रण्‍ाालीमध्‍ये माहिती भरण्‍यासाठी 

शिक्षक मिञांना उपयुक्‍त ठरतील अशा खालील बाबी.

१.सरल प्रणाली मध्‍ये ऑनलाईन माहिती कशी भरावी याविष्‍ायीचे व्हिडीओ.

२.सरल प्रणाली मध्‍ये माहिती भरण्‍यासाठी उपयुक्‍त माहिती.

३.शाळा , 
शिक्ष्‍ाक, विदयार्थी माहिती संकलनासाठी फॉरमॅट

सरल संगणक प्रणाली विषयी सविस्‍तर म‍ाहिती 

मिळविण्‍यासाठी खालील लिंकला भेट दया.

Saturday, 1 August 2015

राज्‍य भरातील शिक्षकांकडून मिळत असलेल्‍या उस्‍फूर्त प्रतिसादामुळे अल्‍पावधीतwww.mahazpschool.blogspot.in या संकेत स्‍थळाला एक लाखापेक्षाही जास्‍त वाचकांनी भेटी दिल्‍यामुळे सर्वांचे आभार .
या संकेतस्‍थळावर आपणास खालील महत्‍वपूर्ण माहिती मिळेल
१. इंटरअॅक्‍टीव ऑफलाईन ई-प्रश्‍नपेढी
२. शाळेत ई-लर्निंग राबविण्‍यासाठी उपयुक्‍त ई-लर्निंग साहित्‍य
३. विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी आॅनलाईन टेस्‍ट
४. स्‍वत चा ब्‍लाॅग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक असणारी सर्व सचिञ माहिती.
५. ई- लर्निंगचा वापर करताना विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी ऑनलाईन टेस्‍ट तयार करण्‍यासाठी सचिञ परिपूर्ण माहिती.
६. गुगल फॉर्म तयार करण्‍ो व त्‍याचा वापर करण्‍याची सचिञ माहिती
७. मार्गदर्शक वर्णनात्‍मक नोंदी
८.महत्‍त्‍वाचे शासननिर्णय
९. विदयार्थ्‍यासाठी सुविचार, बोधकथा, दिनविशेष,सकाळ बालमिञ , प्रार्थना
१० महत्‍त्‍वाच्‍या शासकीय वेबसाईट
११. RTE कायदा
१२. १ली ते ७ वी पर्यंतच्‍या कविता 
१३. कार्यालयीन टपाला साठी आवश्‍यक असणारे फॉरमेट
१४.म‍हत्‍वाच्‍या शैक्ष्‍ाणिक अॅप्‍सच्‍या डाऊनलोडसाठी लिंक
१५. School Data base सरल विषयी सविस्‍तर माहिती व फॉरमेट
वरील सर्व उपयुक्‍त शैक्षणिक माहितीचे अपडेट तुमच्‍या मोबाईल वर मिळविण्‍यासाठी खालील लिंकवरुन Maha ZP School चे फ्री अॅन्‍ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा.



Sunday, 19 July 2015

ई-प्रश्‍नपेढी

अध्‍ययन-अध्‍यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्‍यांचा कृतियुक्‍त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in  या संकेतस्‍थळावर ई-प्रश्‍नपेढी तयार करण्‍यात आलेली अाहे. 

ई-प्रश्‍नपेढीची वैशिष्‍टये -
   १. इंटरअॅक्‍टीव पध्‍दतीचा वापर करुन तयार करण्‍यात आलेली प्रश्‍नपेढी.
   २. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
   ३. प्रत्‍येक प्रश्‍न सोडविल्‍यास उत्‍तर चूक की बरोबर आहे हे समजते.
   ४. प्रत्‍येक चाचणी नंतर तात्‍काळ निकाल येतो.
   ५. कॉम्‍प्‍युटर, प्रोजेक्‍टर वर सुलभतेने वापरता येते.
   ६. ई-प्रश्‍नपेढी सहजरित्‍या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्‍ये ई-प्रश्‍नपेढीच्‍या फाईल तयार करण्‍यात आलेल्‍या आहेत
   ७. विदयार्थी कृतियुक्‍तपणे सहभागी होतात.


इयत्‍ता १ ली साठीची ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इ.१ली ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा.       


इ.२ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.३ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.४ थी ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


            आपणास ई-प्रश्‍नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्‍य प्रतिक्रिया देण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

वाचकांच्‍या प्रतिक्रिया नोंदवा.

Wednesday, 8 July 2015

School Database सरल संगणक प्रणाली

शाळा, शिक्षक, विदयार्थी या सर्वांची माहिती सरल ( SARAL- Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबतचा शासननिर्णय शासनाने ३ जुलै रोजी काढला. या शासननिर्णयाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षा पासून करायची आहे . यासाठी प्रत्‍येक शाळेने Online Database  भरणे आवश्‍यक झाले आहे.भविष्‍यात याचे अनेक फायदे शिक्षण क्षेञात होणार आहेत.  यामध्‍ये माहिती भरण्‍यास सर्व शिक्षक मिञांना मदत  व्‍हावी यासाठी सरल संगणक प्रणाली विषयी थोडक्‍यात माहिती खालील मुदद्या द्वारे  देण्‍यात आली आहे.

1.सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय
2.आवश्‍यक माहिती
3.माहिती संकलनासाठी आवश्‍यक फॉरमेट
4.सचिञ माहिती-
5.सरल संगणक प्रणाली व्हिडिओ -

स्‍कूल डाटाबेस मध्‍ये माहिती संकलन करण्‍यासाठी खालील फॉरमेट डाऊनलोड करा.

शाळा माहिती                           डाऊनलोड
शिक्ष्‍ाक माहिती                        डाऊनलोड
विदयार्थी माहिती                     डाऊनलोड


सरल संगणक प्रणाली विषयी सविस्‍तर माहिती मिळविण्‍यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.

http://mahazpschool.blogspot.in/p/school-data-base.html

Saturday, 25 April 2015

इ.5वी नवीन पाठयक्रम प्रशिक्षण

इ. 5 वी च्या नवीन पाठयक्रमाच्या प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या PPT डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Download  All  PPT

Tuesday, 21 April 2015

चला सुट्टीचा योग्य उपयोग करुया…… स्वत:चा ब्लॉग तयार करुया....


आज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तुमच्या शाळेतील या उपक्रमांची माहिती इतरही शाळांना व्हावी यासाठी आज सोशल मिडियाचा सर्वात जास्त वापर केला जात आहे.
तुम्हालाही तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थळ तयार करायचे असल्यास याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या शाळेचा ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाईल. 
तसेच सध्या परीक्षा झालेल्या आहेत व नंतर उन्हाळयाची सुट्टीही आहे. या सुट्टीचा उपयोग करुया व आपल्या शाळेचे स्वतंञ असे संकेतस्थळ तयार करुया.
चला तर मग आता शिकूया ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे बनवावी. खालील लिंकवर ब्लॉग कसा तयार करावा याची माहिती सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.


Saturday, 11 April 2015

गुगल फॉर्म तयार करणे.

          सध्या कार्यालयीन कामकाजात टपालाचे प्रमाण वाढत आहे. रोज नव नवीन टपाल मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांसह सर्वच पर्यवेक्षणीय अधिकारी वर्गाला दयावा लागतो. सर्व शाळांकडून टपाल तात्काळ प्राप्त व्हावा , टपालाचे संकलन सहजरित्या व्हावे या सारखे अनेक फायदे करुन घ्यायचे असतील तर टपालाची मागणी करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केल्यास निश्चितच टपाल जलदरित्या जमा होवून त्याचे संकलनही सहजरित्या होईल. गुगल फॉर्म ने टपाल गोळा करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस होतील व मोठया प्रमाणात कागदाची बचत होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.

        
            यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या टपालाचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे माहिती करुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Monday, 6 April 2015

आकारिक मूल्यमापन

आकारिक मूल्यमापन करताना कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण या विषयांचे मूल्यमापन करताना शिक्षकांना उपयुक्त ठरतील अशा महत्त्वाच्या  फाईल खाली दिलेल्या आहेत. आपण त्या डाऊनलोड करुन कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण या विषयाचे मूल्यमापन करु  शकता.

कला

कार्यानुभव

शारिरीक शिक्षण

Saturday, 4 April 2015

                      
           आज एकविसाव्या  शतकात माहिती तंञज्ञानाचा प्रत्येक कामकाजात मोठया प्रमाणात वापर होवू लागला आहे. यामध्ये आता आपल्या ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांडया वरील प्राथमिक शाळा ही मागे राहिलेल्या नाहीत. आज बहुतेक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. त्याद्वारे  संगणक, प्रोजेक्टर, इंटरनेटचा वापर करुन विदयार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अध्ययन अनुभव देण्याचा प्रयत्न अनेक होतकरु शिक्षक करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कार्यालयीन कामातही संगणकाचा वापर वाढलेला आहे. 
              या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार करुन आपल्या सर्व शिक्षक बांधवांना शाळांमध्ये ई-लर्निंग सुरु करण्यासाठी मदत मिळावी, त्यांच्या शैक्षणिक , कार्यालयीन कामात सुलभता यावी, विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन टेस्ट सोडविता याव्यात यासाठी   www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
1. ऑनलाईन टेस्ट -
                        इयत्ता 4 थी, 7 वी च्या विदयार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विदयार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सोडविल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत ?  ही महत्त्वाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

2. ई-लर्निंग -
                             आज ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांडया वरील प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. या शाळांमधील शिक्षकांना वर्गात अध्यापन करताना, विदयार्थ्यांच्या सरावासाठी आवश्यक ठरतील असे अनेक शैक्षणिक सॉप्टवेयर, फाईल्स या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ते डाऊनलोड करुन त्यांचा वापर शाळेमध्ये करता येईल.

3. बालमिञ -
                    विदयार्थी बालमिञांना शाळेमध्ये परीपाठामध्ये दररोज नियमित उपयोगी पडतील असे सुुविचार, दिनविशेष, बोधकथा, प्रार्थना, सामान्य ज्ञान हे घटक बालमिञ या पेजवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच विदयार्थ्यांची आवडीची असलेली सकाळ वर्तमान पञातील बालमिञही पुरवणी सुध्दा या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

4. महत्त्वाचे शासननिर्णय -
                             शिक्षकांना वेळोवेळी आवश्यक असणारे महत्त्वाचे शासननिर्णय या पेजवर देण्यात आलेले आहेत.

5.  E-Books -
                        महाराष्ट्र शासनाची इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतची सर्व माध्यमांची पाठयपुस्तके या पेजवर असून आपण ती डाऊनलोड करुन घेवू शकता.

6. महत्त्वाच्या वेबसाईट -
                             शासनाच्या सर्वांच्या उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या वेबसाईट या पेजवर देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, MPSP, यशदा, स्कूल मँपिंग, स्कूल रिपोर्ट कार्ड, यु-डायस, माध्यान्ह भोजन योजना, जात प्रमाणपञ पडताळणी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नोकरी मार्गदर्शन केंद्र यांसारख्या अनेक महत्त्वाच्या वेबसाईटच्या लिंक या पेजवर देण्यात आलेल्या आहेत.

7. आदर्श शाळा -
                           आज अनेक शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्या शाळांच्या उपक्रमांना प्रसिध्दी देण्याचे तसेच या उपक्रमांची माहिती इतर शाळांना ही व्हावी  त्यांनीही अशाच प्रकारचे नाविण्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेतही राबवून विदयार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणावी या साठी आदर्श शाळा या पेजची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपणासही आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती दयायची असल्यास आपण उपक्रमांची थोडक्यात माहिती व छायाचिञे mahazpschool.rediffmail.com  यावर मेल करुन पाठवावीत.

8. कार्यालयीन -
                           मुख्याध्यापकांना वेळोवेळी टपाल्‍ा कामासाठी आवश्यक असणारे मासिक पञक, शालेय पोषण आहार टपाल, प्रवेश निर्गम, कार्यालयीन रजिस्टर या सारखे अनेक फॉरमॅट या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

9. शिक्षकमिञ -
                          शिक्षकमिञांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना विदयार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी,  विदयार्थ्यांना दयावयाचे इयत्तानिहाय प्रकल्प, संकलित मूल्यमापन करताना विदयार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या इयत्ता निहाय नमुना प्रश्नपञिका ,  संगणीकृत निकालपञक  या सारख्या अनेक गोष्टी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासर्व आपण डाऊनलोड करुन वापरु शकता.

10. कविता -
                         विदयार्थ्यांच्या पाठयपुस्तकातील  कविता mp3 फॉरमॅट मध्ये या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्या डाऊनलोड करुन आपण वापरु शकता.

11. चला ऑनलाईन फॉर्म भरु -
                              विदयार्थ्यांना साविञीबाई फुले, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणार्‍या पालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती   मिळण्यासाठी ऑन लाईन फॉर्म भरावे लागतात. यामध्ये येणा-या अडचणी सोडविण्यासाठी   या सदराची निर्मिती करण्यात आलेली आहे.

12. शालार्थ -
                     शालार्थ  वेतन प्रणाली मध्ये शिक्षकांची मासिक वेतन बिले ही ऑन लाईन तयार करावी लागतात. त्याची सुविधा याठिकाणी करुन देण्यात आली आहे.   

                      तसेच आपल्या शाळेचा ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे तयार करता येईल ? विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट कशा प्रकारे तयार करावी ? ,  शैक्षणिक व्हिडिओ कशा प्रकारे तयार करावेत ? पावर पॉइंट प्रेझेंटेशन (ppt) कशा प्रकारे तयार करावे ? पावर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये स्वत: चा आवाज कशा प्रकारे समाविष्ट करावा ? यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटकांची सविस्तर माहिती लवकरच आपल्याला पूर्णपणे मोफत या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
                      तरी आपण सर्वांनी या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा व विदयार्थ्यांना नवीन तंञज्ञानाच्या आधारे चिरकाल टिकतील असे अध्ययन अनुभव दयावेत . ही एकच अपेक्षा. 

                                                                                              श्री नितीन रोहोकले 
                                                                       प्रा.शा किनगाव, ता-अंबड, जि-जालना.