Saturday, 4 April 2015

                      
           आज एकविसाव्या  शतकात माहिती तंञज्ञानाचा प्रत्येक कामकाजात मोठया प्रमाणात वापर होवू लागला आहे. यामध्ये आता आपल्या ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांडया वरील प्राथमिक शाळा ही मागे राहिलेल्या नाहीत. आज बहुतेक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. त्याद्वारे  संगणक, प्रोजेक्टर, इंटरनेटचा वापर करुन विदयार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अध्ययन अनुभव देण्याचा प्रयत्न अनेक होतकरु शिक्षक करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कार्यालयीन कामातही संगणकाचा वापर वाढलेला आहे. 
              या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार करुन आपल्या सर्व शिक्षक बांधवांना शाळांमध्ये ई-लर्निंग सुरु करण्यासाठी मदत मिळावी, त्यांच्या शैक्षणिक , कार्यालयीन कामात सुलभता यावी, विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन टेस्ट सोडविता याव्यात यासाठी   www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
1. ऑनलाईन टेस्ट -
                        इयत्ता 4 थी, 7 वी च्या विदयार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये विदयार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सोडविल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत ?  ही महत्त्वाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

2. ई-लर्निंग -
                             आज ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, तांडया वरील प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. या शाळांमधील शिक्षकांना वर्गात अध्यापन करताना, विदयार्थ्यांच्या सरावासाठी आवश्यक ठरतील असे अनेक शैक्षणिक सॉप्टवेयर, फाईल्स या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ते डाऊनलोड करुन त्यांचा वापर शाळेमध्ये करता येईल.

3. बालमिञ -
                    विदयार्थी बालमिञांना शाळेमध्ये परीपाठामध्ये दररोज नियमित उपयोगी पडतील असे सुुविचार, दिनविशेष, बोधकथा, प्रार्थना, सामान्य ज्ञान हे घटक बालमिञ या पेजवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच विदयार्थ्यांची आवडीची असलेली सकाळ वर्तमान पञातील बालमिञही पुरवणी सुध्दा या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

4. महत्त्वाचे शासननिर्णय -
                             शिक्षकांना वेळोवेळी आवश्यक असणारे महत्त्वाचे शासननिर्णय या पेजवर देण्यात आलेले आहेत.

5.  E-Books -
                        महाराष्ट्र शासनाची इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतची सर्व माध्यमांची पाठयपुस्तके या पेजवर असून आपण ती डाऊनलोड करुन घेवू शकता.

6. महत्त्वाच्या वेबसाईट -
                             शासनाच्या सर्वांच्या उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या वेबसाईट या पेजवर देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, MPSP, यशदा, स्कूल मँपिंग, स्कूल रिपोर्ट कार्ड, यु-डायस, माध्यान्ह भोजन योजना, जात प्रमाणपञ पडताळणी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नोकरी मार्गदर्शन केंद्र यांसारख्या अनेक महत्त्वाच्या वेबसाईटच्या लिंक या पेजवर देण्यात आलेल्या आहेत.

7. आदर्श शाळा -
                           आज अनेक शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्या शाळांच्या उपक्रमांना प्रसिध्दी देण्याचे तसेच या उपक्रमांची माहिती इतर शाळांना ही व्हावी  त्यांनीही अशाच प्रकारचे नाविण्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेतही राबवून विदयार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणावी या साठी आदर्श शाळा या पेजची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपणासही आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती दयायची असल्यास आपण उपक्रमांची थोडक्यात माहिती व छायाचिञे mahazpschool.rediffmail.com  यावर मेल करुन पाठवावीत.

8. कार्यालयीन -
                           मुख्याध्यापकांना वेळोवेळी टपाल्‍ा कामासाठी आवश्यक असणारे मासिक पञक, शालेय पोषण आहार टपाल, प्रवेश निर्गम, कार्यालयीन रजिस्टर या सारखे अनेक फॉरमॅट या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

9. शिक्षकमिञ -
                          शिक्षकमिञांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना विदयार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी,  विदयार्थ्यांना दयावयाचे इयत्तानिहाय प्रकल्प, संकलित मूल्यमापन करताना विदयार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या इयत्ता निहाय नमुना प्रश्नपञिका ,  संगणीकृत निकालपञक  या सारख्या अनेक गोष्टी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासर्व आपण डाऊनलोड करुन वापरु शकता.

10. कविता -
                         विदयार्थ्यांच्या पाठयपुस्तकातील  कविता mp3 फॉरमॅट मध्ये या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्या डाऊनलोड करुन आपण वापरु शकता.

11. चला ऑनलाईन फॉर्म भरु -
                              विदयार्थ्यांना साविञीबाई फुले, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणार्‍या पालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती   मिळण्यासाठी ऑन लाईन फॉर्म भरावे लागतात. यामध्ये येणा-या अडचणी सोडविण्यासाठी   या सदराची निर्मिती करण्यात आलेली आहे.

12. शालार्थ -
                     शालार्थ  वेतन प्रणाली मध्ये शिक्षकांची मासिक वेतन बिले ही ऑन लाईन तयार करावी लागतात. त्याची सुविधा याठिकाणी करुन देण्यात आली आहे.   

                      तसेच आपल्या शाळेचा ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे तयार करता येईल ? विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट कशा प्रकारे तयार करावी ? ,  शैक्षणिक व्हिडिओ कशा प्रकारे तयार करावेत ? पावर पॉइंट प्रेझेंटेशन (ppt) कशा प्रकारे तयार करावे ? पावर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये स्वत: चा आवाज कशा प्रकारे समाविष्ट करावा ? यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटकांची सविस्तर माहिती लवकरच आपल्याला पूर्णपणे मोफत या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
                      तरी आपण सर्वांनी या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा व विदयार्थ्यांना नवीन तंञज्ञानाच्या आधारे चिरकाल टिकतील असे अध्ययन अनुभव दयावेत . ही एकच अपेक्षा. 

                                                                                              श्री नितीन रोहोकले 
                                                                       प्रा.शा किनगाव, ता-अंबड, जि-जालना.            

No comments:

Post a Comment