Tuesday 10 March 2015

स्मार्ट टिचर

         आज ई-लर्निंग सुविधा बहुतेक शाळांमध्ये कॉम्प्युटर, प्रोजेक्टर आणून सुरु झालेली आहे. तसेच अनेक शाळांमध्ये ई-लर्निंग सुुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने खाजगी कंपनीने तयार केलेला अभ्यासक्रमच वापरला जातो. या मध्ये अनेक उणीवा शिक्षकांना अध्यापन करताना जाणवतात. परंतु पर्याय नसल्यामुळे शिक्षकांना तोच अभ्यासक्रम वापरावा लागतो. पण जर स्मार्ट टिचर असतील तर ते स्वत: अनेक शैक्षणिक गोष्टी त्यात तयार करतील . 
              यामध्ये प्रामुख्याने , ऑनलाईन टेस्ट तयार करणे,  शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, शाळेचा ब्लॉग तयार करणे, शैक्षणिक सॉप्टवेयर तयार करणे, पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे यासारख्या अनेक गोष्टी शिक्षकांना करता आल्यास स्मार्ट टिचर तयार होतील. व विदयार्थ्यांसाठी  ई-लर्निंग सुविधेचा वापर करुन दर्जेदार शैक्षणिक अध्ययन- अनुभव देवू शकतील. यासाठी सर्व शिक्षकांना उपयोगी येतील अशा अनेक गोष्टींची निर्मिती कशा प्रकारे करावी याची माहिती याठिकाणी करुन देण्यात येणार आहे.



No comments:

Post a Comment