प्रास्ताविक गुणवत्ता कार्यक्रम

प्रस्तावित गुणवत्ता कार्यक्रम महाराष्ट्र राज्य

गुणवत्तापूर्ण शिक्षण हा प्रत्येक बालकाचा घटनात्मक हक्क आहे आणि तो बालकांना मिळवून देण्यास शासन बांधील आहे. शासन त्या दिशेने काही निर्णय घेत आहे. यापूर्वी शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने काही निर्णय घेतले आहेत. सर्व शिक्षा अभियानातून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अनुषंगाने त्या चौकटीत काही कार्यक्रम आखले आहेत. ‘आम्हाला कोणतेही समांतर कार्यक्रम देऊ नका. मुख्य धारेचा एकच गुणवत्ता कार्यक्रम द्या.’ असे शिक्षकांनी वारंवार सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे चार निर्णय आणि कार्यक्रम एकमेकांशी सुसुत्रतेने जोडून एक गुणवत्ता कार्यक्रम सादर करीत आहोत.
1) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
2)
पायाभूत इतर दोन चाचण्या
3) Innovations
चा निवडक शाळांमधील कार्यक्रम
4)
विकेंद्रित पद्धतीने तालुका आणि केंद्र पातळीवर प्रशिक्षणे
2015-16 या शैक्षणिक वर्षात राज्याच्या गुणवत्ता कार्यक्रमाचा केंद्रबिंदू भाषा गणित हा राहील. इतर विषयांचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू राहील. इतर विषयांचे पथदर्शी गट तयार करणे, त्यांच्या कार्यशाळा घेणे . बाबतचे निर्णय मधल्या काळात घेण्यात येतील. 
प्रशिक्षणे फार झाली आणि तरीही अपेक्षित निष्पत्तीपर्यंत आपण पोहोचलेलो नाही असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणांना कंटाळलेले आहेत. पण आपण यावेळी शुद्ध विज्ञानाचा आधार घेऊन प्रशिक्षणे यशस्वी करण्याचा निकराचा प्रयत्न करु. विज्ञानाचा आधार घेणे म्हणजे, मुलांच्या शिकण्यामागचं विज्ञान शिक्षकांना जाणवून देणे. तेही जड भाषेतून नाही तर फार सोपेपणाने. शिक्षकांनाही वर्गात मुलांच्या शिकण्याचे काही अनुभव असतातच. मुलांच्या शिकण्याबाबतच्या काही अंधश्रद्धा शिक्षकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत त्या दूर कण्याचा जोरकस प्रयत्न प्रशिक्षणांमधून कल्पतेकने करु.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अनुभवांच्या आधारे तो अधिकाधिक समृद्ध करत जाता येईल.
महाराष्ट्राची तत्त्वे
गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, शिक्षक अधिकारी सबलीकरण, त्यासाठीची प्रशिक्षणे आणि बालकांचे व्यवस्थेचे मूल्यमापन याकडे एकत्रितपणे पाहून सर्वंकष असा एकच कार्यक्रम तयार करणे 
तो SCERT च्या छत्राखाली राबविणे
सातत्याने 3 वर्षे अंमलबजावणी करणे 
या काळात कोणतेही समांतर कार्यक्रम होणार नाहीत
विश्वासावर आधारित व्यवस्थेद्वारे हा कार्यक्रम राबविणे
व्यवस्थेबाहेरच्यांचे या कामात खुले साहाय्य घेणे तरीही शासनाच्या जबाबदाऱ्या आउटसोर्स करता शासकीय व्यवस्था बळकट करीत जातील अशी धोरणे अवलंबणे
सर्व घटकांचा सहभाग घेऊनच सर्व गोष्टी ठरविणे
कायद्याच्या कलम 29 नुसार वर्गातील शिक्षण होईल याकडे कटाक्षाने पाहणे 
प्रत्येक मूल शिकले पाहिजे या दृष्टीने व्यवस्थेतील प्रत्येकाच्या दृष्टिकोनात प्रत्येक वर्गातील शिक्षणपद्धतीत बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू राहील. हे केल्यास संपादणुकीत आपोआपच मोजण्यायोग्य वाढ मिळेल. केवळ संपादणुकीत वाढ दाखवायच्या उद्दिष्टाने काम केले जाणार नाही. 
शाळातपासणी, वर्गतपासणी यात मुलांना त्यांचे जे काम सादर करायचे आहे ते प्राधान्याने पाहिले जाईल. काय येत नाही याची उलटतपासणी घेण्याच्या किंवा शेरे लिहिण्याच्या दृष्टीने या भेटी होणार नाहीत. तर मदत करण्याच्या दृष्टीने होतील.
कार्यक्रमाची प्रक्रिया - विद्यार्थ्यांसाठी
कायद्याच्या कलम 29 चा वर्गावर्गात बालकांना प्रत्यक्ष अनुभव मिळणे
मूल कसे शिकते यानुसार आणि बालकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येक विषयासाठी आखलेली शिक्षणपद्धती
भाषाआरंभिक वाचन-लेखन पेडॅगॉजीनुसार शिकविणेमुलांच्या भाषेचा सन्मानाने वापर, व्यक्त होण्यास स्थान
गणितदोन पायऱ्यांची स्वतः कृती करीत शिकण्याची पद्धत
शिक्षकांतर्फे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
आवश्यकतेनुसार वेळच्या वेळी मदतयात योग्य शिक्षणपद्धतीचा वापर
नापास केले जाणार नाही पण प्रत्येक बालकाने त्या इयत्तेचा 80 टक्के तरी अभ्यास शिकूनच वरच्या वर्गात गेले पाहिजे.
विशेष गरज असलेल्या ज्या मुलांना वरील उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे जीवशास्त्रीय कारणाने शक्य नसेल अशा मुलांसाठी शिक्षण हक्क कायद्यातीलप्रत्येक बालकाने त्याच्या क्षमतेच्या जास्तीतजास्त पातळीपर्यंत शिकणेया उद्दिष्टानुसार ध्येय आखले जाईल. त्याच्या 80 टक्के पातळीपर्यंत प्रत्येक मूल पोहोचेल असा प्रयत्न केला जाईल.
वयानुरूप प्रवेश घेतलेल्या बालकांना 3 महिने ते 2 वर्षे विशेष प्रशिक्षण. याची शासनाकडून योग्य व्यवस्था. हे काम केवळ शिक्षकांवर सोडून दिले जाणार नाही. (आताच्या कार्यक्रमात हे समाविष्ट नाही.)
मुलांना यशाचे अनुभव येतील असे वातावरण संधी 
उत्तम कामगिरी दाखविण्याची वारंवार विविध विषयांमध्ये संधी
व्यवस्थेच्या मूल्यमापनासाठीचे रॅंडम सॅंपल मूल्यमापन
कार्यक्रमाची प्रक्रिया - शिक्षकांसाठी
आधी उच्च दर्जाचे इनपुट
प्रेरणादायी प्रशिक्षणे
शिक्षकांना प्रक्रियेचे पूर्ण स्वातंत्र्य, निष्पत्तीचे बंधन
विश्वासावर आधारलेली व्यवस्था
विविध विषयांसाठी पेडॅगॉजीच्या कार्यशाळा
त्यात पारंगत होईपर्यंत सातत्याची मदत
या प्रक्रियेत स्वयंमूल्यमापन 
त्याद्वारे सुधारणा
मग बाह्य मूल्यमापन
पुन्हा सुधारण्याची संधी साहाय्य
त्यातही अयशस्वी झाल्यास शैक्षणिक कामातून इतरत्र बदली कारण मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्काच्या आड कोणीही येऊ शकत नाही.
कार्यक्रमाची प्रक्रियाअधिकाऱ्यांसाठी
व्यवस्थापकीय कामाच्या, पेडॅगॉजीच्या आणि MOT च्या कार्यशाळा
स्पष्ट जॉब चार्ट नुसार काम
आधी उच्च दर्जाचे इनपुट
प्रेरणादायी प्रशिक्षणे
अधिकाऱ्यांना प्रक्रियेचे पूर्ण स्वातंत्र्य, निष्पत्तीचे बंधन
विश्वासावर आधारलेली व्यवस्था
व्यवस्थापकीय शैक्षणिक साहाय्याच्या कामात पारंगत होईपर्यंत सातत्याची मदत
या प्रक्रियेत स्वयंमूल्यमापन
त्याद्वारे सुधारणा
मग बाह्य मूल्यमापन - कार्यकक्षेतील बालकांच्या संपादणुकीचे
पुन्हा सुधारण्याची संधी साहाय्य
त्यातही अयशस्वी झाल्यास शैक्षणिक कामातून इतरत्र बदली कारण मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्काच्या आड कोणीही येऊ शकत नाही.
कार्यक्रमातील घटक, त्यांचे स्वरूप वेळापत्रक
मे 2015 - अधिकाऱ्यांचे सबलीकरण
राज्य, जिल्हा, तालुका केंद्र स्तरावरील अधिकाऱ्यांसाठीम्हणजेच SCERT officers, EOs, BEOs, DIET facilty, BRPs, KPs या सर्वांसाठी - MOT कार्यशाळा. यात MOT बरोबरच भाषा आणि गणिताच्या पेडॅगॉजीचा परिचय, मूल्यमापनाच्या सर्व अंगांचा परिचय, CCE मधून अपेक्षित गोष्टी, संकलित चाचण्यांचा परिचय आणि innovations कार्यक्रमाअंतर्गत पथदर्शी शाळानिवडीबाबत चर्चा होईल. ज्या शाळांमधले शिक्षक स्वेच्छेने भाषा आणि गणिताच्या गुणवत्तेचे काम करू इच्छितात अशा शाळांमधून प्रत्येक केंद्रात 1 पथदर्शी शाळा निवडण्याबाबतची चर्चा यात होईल.
या अधिकाऱ्यांनी भाषा आणि गणित यापैकी कोणत्या विषयावर आपण सखोल काम करणार हे सांगावे. हे अनिवार्य नाही. ज्यांना स्वेच्छेने करायचे आहे त्यांनी सांगावे. भाषा किंवा गणिताबरोबरच इंग्रजी, परिसर अभ्यास, समाजशास्त्रे, विज्ञान, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण यापैकी एका विषयावर सखोल काम करायचे असेल तर तसेही सांगावे. हे अधिकारी त्या विषयाच्या पथदर्शी टीमचा भाग असतील.
एप्रिल-मे 2015
• Innovations
मधील शाळांची निवड 15 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्रत्येक केंद्रातून एक शाळा निवडणे (याचे स्वतंत्र परिपत्रक आहे) 
या शाळांनी भाषा आणि गणित यापैकी एक विषय सखोल कामासाठी निवडायचा आहे. भाषा किंवा गणिताबरोबरच इंग्रजी, परिसर अभ्यास, समाजशास्त्रे, विज्ञान, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण यापैकी एका विषयावर सखोल काम करायचे असल्यास तसेही सांगावे. 
या प्रत्येक शाळेतील एक शिक्षक हा त्या विषयाच्या पथदर्शी टीमचा भाग असेल.
मे 2015
भाषा आणि गणित विषयाच्या राज्यस्तरीय स्रोतव्यक्तींची (यात त्या विषयाचे तज्ज्ञ, त्या विषयांमध्ये विशेष काम करणारे डाएट प्राध्यापक आणि शिक्षकही असतील.) सात दिवसीय कार्यशाळा. यात पथदर्शी टीमच्या कार्यशाळांसाठीचे मॉड्युल तयार होईल. तसेच समांतर कार्यशाळा घेण्यासाठी स्रोतव्यक्तींची तयारी होईल.
पथदर्शी टीम
यात स्वेच्छेने आलेल्या शाळांमधून निवडलेल्या प्रत्येक शाळेतील 1 शिक्षक आणि स्वेच्छेने आलेले अधिकारी असतील.
जून 2015 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत पथदर्शी टीमसाठी भाषा आणि गणित या विषयांच्या राज्य स्तरावर 3 दिवसीय पेडॅगॉजी कार्यशाळा होतील. 
या कार्यशाळा स्रोतटीमद्वारे घेतल्या जातील.
पथदर्शी टीममधील शिक्षक अधिकारी त्यांच्या केंद्रासाठी तालुक्यासाठी त्या विषयाचे स्रोतव्यक्ती म्हणून काम करू शकतील. 
ऑगस्ट 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत पथदर्शी टीमसाठी एकूण 8 दिवसांच्या कार्यशाळा होतील. या कार्यशाळाही स्रोतगटाद्वारे घेण्यात येतील. 
त्यांच्या स्वतःच्या वर्गांमधील अंमलबजावणीचा अनुभव, सकारात्मक घटना, अडचणी, तालुका स्तरावरील कार्यशाळांमधील अनुभव, अडचणी याबाबतची चर्चा या कार्यशाळांमध्ये होईल.
हे 8 दिवस कसे मिळावेत (दर महिन्याला 1, की 4 वेळा 2 दिवस) ते विषयाची स्रोतटीम ठरवेल.

पायाभूत चाचणी
जुलै 2015 अखेरीस सर्व राज्यभर भाषा आणि गणित विषयासाठी एक पायाभूत चाचणी होईलही विषयाची समज तपासणारी चाचणी असेल. यात प्रात्यक्षिक, तोंडी, लेखी, मुक्तोत्तरी असे विविध प्रकारचे प्रश्न असतील. 
ही चाचणी शिक्षकांद्वारे घेतली जाईल. 
राज्य पातळीपर्यंत याचे निकाल एकत्र केले जातील. 
पायाभूत चाचणीच्या निकालांत 10 टक्के वाढ करणे हे वर्षभरातील अंमलबजावणीचे उद्दिष्ट राहील
.

No comments:

Post a Comment