गुगल फॉर्म तयार करणे

           सध्या टपालाचे प्रमाण वाढत आहे. रोज नव नवीन टपाल मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांसह सर्वच पर्यवेक्षणीय अधिकारी वर्गाला दयावा लागतो. सर्व शाळांकडून टपाल  तात्काळ प्राप्त व्हावा , टपालाचे संकलन सहजरित्या व्हावे या सारखे अनेक फायदे करुन घ्यायचे असतील तर टपालाची मागणी करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केल्यास निश्चितच टपाल  जलदरित्या जमा होवून त्याचे संकलनही सहजरित्या होईल. 
                     यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या टपालाचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे शिकणार आहोत.

1.   गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते असले पाहिजे.

2.  युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने G- mail खाते Login करावे.




G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने दाखविल्या प्रमाणे Google Drive  वर क्लिक करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन होईल.

3. Google Drive ओपन झाल्यानंतर New  वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील Google Form वर क्लिक करावे



4.  खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय टाईप केला आहे.




5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे  फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या प्रमाणे माहिती Edit  करावी. इमेज मध्ये बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी Done वर क्लिक करावे.

6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते  4 थी पर्यंतच्या वर्गांची माहिती त्यात भरावी.




      वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी Send form  वर क्लिक करावे. 


7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील विंडो ओपन होईल. Link to Share या खाली आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती Copy करुन ठेवावी.   त्यानंतर  Done  वर क्लिक करावे.


8.  त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो. इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा झालेली माहिती आपणास संंकलन होवून  Excel फॉरमॅट मध्ये मिळते.



9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक डिझाइन करु शकतो. 



              अशा प्रकारे गुगल फॉर्म ने टपाल गोळा करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस होतील  व मोठया प्रमाणात कागदाची बचत होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.  



35 comments:

  1. नितिन सर अभिमान आहे मला तुमचा.प्राथमिक शिक्षकांची बुद्धिमत्ता खरच ग्रेट आहे.

    ReplyDelete
  2. नितिन सर अभिमान आहे मला तुमचा.प्राथमिक शिक्षकांची बुद्धिमत्ता खरच ग्रेट आहे.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. सर गुगल फॉर्म तयार करतांना gmail ने खते ओपन केले मात्र आपण सांगितल्याप्रमाणे गुगलच्या खिडक्या येत नाहीत काय करावे ते मेलने कळवा

    ReplyDelete
  5. Your Very Important Advice For Paperless Schools And Useful For All Maharashtra Primary Teachers.

    ReplyDelete
  6. सर . प्रथमतः आपले अभिनंदन व आपणास मनापासून धन्यवाद देतो .
    गुगल फार्म मोबाईलवर तयार करता येईल का ? कृपया मार्गदर्शन करावे.
    dipakbeldar97@gmail.com
    9767661669

    ReplyDelete
    Replies
    1. गुगल फार्म मोबाईलवर तयार करता येईल

      Delete
  7. सर खूपच छान.टपाल तात्काळ प्राप्त होण्याचा आनंद काही वेगळाच आहे!

    ReplyDelete
  8. सर खूपच छान.टपाल तात्काळ प्राप्त होण्याचा आनंद काही वेगळाच आहे!

    ReplyDelete
  9. सर खूपच छान.टपाल तात्काळ प्राप्त होण्याचा आनंद काही वेगळाच आहे!

    ReplyDelete
  10. ग्रेट सरजी,तुमचा ब्लॉग अतिशय उपयुक्त आहे,आपणपासून प्रेरणा घेवून मीपण माझा nikamr.blogspot.com हा ब्लॉग बनविला आहे,क़पया ब्लोग बघा आणि आवश्यक ते मार्गदर्शन करा,

    ReplyDelete
  11. सरजी खुपच छान माहिती

    ReplyDelete
  12. खरच छान माहिती आहे ….GREAT JOB

    ReplyDelete
  13. गुगल फॉर्म बाबत अतिशय उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  14. maan gai sir ji best maloomat

    ReplyDelete
  15. खूप छान blog व माहिती दिल्याबद्दल

    ReplyDelete